बंदूक लावा, हत्या करा, घाबरणार नाही : संजय राऊत

नवी दिल्ली : मला पूर्ण कल्पना होती की ईडी माझ्या मागे लागणार होती. बंदूक लावा, हत्या करा, घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी ईडीने कारवाई केल्यानंतर दिली.

संजय राऊत म्हणाले, त्यांना वाटत असेल शिवसेना फसली आहे. पण सूडाच्या राजकारणापुढे आम्ही गुढघे टेकणार नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी त्यापुढे गुढघे टेकणार नाही. मला पूर्ण कल्पना होती की ईडी माझ्या मागे लागणार, सीबीआय लागणार, ज्या पद्धतीने आम्ही सरकार स्थापन केलं, मी व्यंकय्या नायडूंना पत्रही लिहिलं आहे, माझ्यावर दबाव येतोय, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आहे. 

  आज जे ते काय सांगत आहेत, ते आम्ही कष्टाच्या पैशातून घेतलं आहे. घर असेल, गावची लहानची जमीन असेल, 2009 मध्ये घेतलीय. भाजपचे नाचे जे नाचतायत ना, हा राजकीय दबाव आहे, एक रुपया जरी भ्रष्टाचाराचा, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर मी संपूर्ण संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करायला तयार आहोत. राहत्या घरावर कारवाई हा सूड आहे, घरातून बाहेर काढलं हा सूड आहे.. म्हणजे हा सूड मराठी माणसावर घेतला जात आहे, मुंबईमध्ये इतक्या खालचं राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं.

🤙 9921334545