कोल्हापूर : उतर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश नाईक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरातून सवादय प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीला मतदारातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथील उभा मारूती चौकातून प्रचार फेरीस सुरवात झाली. टिंबर मार्केट, पाण्याचा खजिना, बेलबाग, मंगळवार पेठ, पीटीएम तालीम, दिलबहार तालीम, शिवाजी पुतळा या मार्गातून प्रचार फेरी निघाली होती. यावेळी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. शहरातून फिरून रंकाळा परिसरात या प्रचार फेरीची सांगता झाली.
या प्रचार फेरीत उमेदवार राजेश नाईक, संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव, करवीर महिला अध्यक्षा अनिता निकम,ज्ञानदेव पाटील, बळवंत तळसकर शंकर पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.