वरुणराजा गरजला पण बरसला नाही !

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाने हजेरी लावली. वरुणराजा मोठ्या प्रमाणात गरजला पण बरसला नाही. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्याने थोडासा दिलासा मिळाला. पण बत्ती गुल झाल्याने पुन्हा उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात उष्णता वाढल्याने उन्हाच्या कडाक्याने अंगाची काहिली होत आहे. सकाळी दहा-अकरा वाजल्यानंतर बाहेर पडल्यास उन्हाचे चटके बसत आहेत. हवामान खात्याने पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. सोमवारी सायकाळीपासून ढगाळ वातावरण झाले होते. तर मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह शहरात पावसाला सुरुवात झाली. मात्र हलक्या सरी कोसळल्याने हा पाऊस  हवेत गारवा निर्माण करू शकला नाही.

🤙 9921334545