भाजप आणि भागीरथी संस्थेच्या महिलांकडून शिस्तबध्द प्रचार मोहिम; घरोघरी संवाद

कोल्हापूर : शिस्तबध्द आणि सुनियोजित आखणी करून भाजप-ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेविकांनी प्रचार मोहिम सुरू केली आहे. शिवाय अरूंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भागीरथी संस्थेच्या महिला कार्यकर्त्या घरोघरी जाऊन, कोल्हापूर उत्तर मतदार संघातील भाजपचे उमेदवार सत्यजितनाना कदम यांचा प्रचार करत आहेत.

शहरातील विविध अपार्टमेंट, टाऊनशिपमध्ये जाऊन, सर्व महिलांना एकत्र करून, भागीरथीच्या अध्यक्षा सौ.अरूंधती महाडिक प्रचार सभा घेत आहेत. तर उद्या कोणत्या भागात जाऊन प्रचार करायचा, याचे नियोजन आदल्या दिवशी होते. त्यानुसार सकाळी ८ वाजल्यापासून भागीरथी संस्थेच्या कार्यकर्त्या आणि भाजप ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेविका, प्रचार मोहिमेसाठी सज्ज होतात. ठरवून दिलेल्या भागात घरोघरी जाऊन, या महिला कार्यकर्त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचतात आणि भाजपची ध्येय धोरणे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची विकासात्मक दृष्टी, संपूर्ण जगात वाढलेला भारताचा दबदबा, देशातून भाजपला मिळालेला जनाधार, कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे नेमके प्रश्‍न आणि सत्यजितनाना कदम यांची महापालिकेतील कार्यपध्दती याबद्दल माहिती देतात.

विशेषतः कोल्हापूर शहरातील महिलांचे प्रश्‍न, राज्य सरकारकडून महिलांविषयक योजनांची अपेक्षा याबद्दल भागीरथीच्या कार्यकर्त्या महिला मतदारांशी संपर्क साधतात. अत्यंत शिस्तबध्द आणि कोणावरही टीका न करता केवळ भाजपचा विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडला जातो. त्यामुळे भाजप-ताराराणी आणि भागीरथीच्या महिला कार्यकर्त्यांची प्रचाराची मोहिम कौतुकाचा विषय बनली आहे. सत्यजितनाना कदम यांनी नगरसेवक म्हणून केलेली कामगिरी, महापूराच्या काळात त्यांनी केलेले काम, भ्रष्टाचाराविरूध्द उठवलेला आवाज आणि भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी राबवलेले उपक्रम याबद्दलही माहिती दिली जाते. त्यामुळे केवळ महिला वर्गच नव्हे, तर पुरूष मतदारही प्रभावित होत आहेत.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरूंधती महाडिक, हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती सोनाली पाटील, सविता कदम, माजी नगरसेविका सीमा कदम, स्मिता माने, रूपाराणी निकम, अर्चना पागर, अनिता ढवळे, उमा इंगळे, माधुरी नकाते, मनिषा कुंभार, कविता माने, राजनंदा महाडिक, शीतल देसाई, हेमा सुर्यवंशी, श्‍वेता साबळे या महिला कार्यकर्त्या भाजपचा सुनियोजित प्रचार करत आहेत. त्यांच्या बरोबरीने भाजप महिला आघाडीच्या गायत्री राऊत, भारती जोशी, पुजा शिराळकर, भाग्यश्री तोडकर, सुजाता पाटील यांनीही प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.