सत्यजित कदम यांची उत्तरेश्‍वर, शुक्रवारपेठेत प्रचार फेरी

कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. उमेदवार सत्यजितनाना कदम यांच्या प्रचारासाठी उत्तरेश्‍वर पेठ, गंगावेश, शुक्रवारपेठ या परिसरात प्रचार फेरी निघाली. शेकडो कार्यकर्ते आणि महिलांसह निघालेल्या प्रचारफेरीला, मतदार जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला.

कदम यांच्या प्रचारासाठी उत्तरेश्‍वर पेठ, गंगावेश, शुक्रवार पेठ परिसरात प्रचारफेरी झाली. उत्तरेश्‍वर पेठेतील वाघाची तालीम समोर असणार्‍या काळभैरव मंदिरात दर्शन घेवून, सत्यजीत कदम यांच्या प्रचारफेरीला प्रारंभ झाला. गळ्यात भगवे स्कार्फ, टोप्या, पक्षाचे ध्वज आणि निवडणूक चिन्ह हातामध्ये घेवून शेकडो कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे भाजपच्या प्रचारफेरीत सहभागी झाले होते. सुमारे दोन तास ही प्रचारफेरी सुरू होती. उत्तरेश्‍वर पेठ, वाघाची तालीम, पंचगंगा तालीम, मस्कुती तलाव, शंकराचार्य मठ, शुक्रवार गेट पोलिस चौकी, दुधाळी मैदान, गवत अड्डा, भाविक विठोबा मंदिर, रंकाळा एस टी स्टॅण्ड, गंगावेश, पाडळकर मार्केट या परिसरात ही प्रचारफेरी पार पडली.

या प्रचारफेरीला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी महिलांनी सत्यजीतनाना कदम यांचे औक्षण केले. तसेच काही घरांसमोर कमळ चिन्हाची सुबक रांगोळी रेखाटली होती. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सत्यजित कदम, धनंजय महाडिक यांच्यासह अन्य भाजप नेत्यांचं स्वागत करत.

या प्रचारफेरीत माजी नगरसेवक किरण शिराळे, संदीप कुंभार, मानसिंग सावंत, राजेंद्र चव्हाण, रमेश सुर्वे, संदीप कसबेकर, गुरू पाटील, विश्‍वास आयरेकर, अमोल पालोजी, संजय माळी, चंद्रकांत आसबे, यशवंत सुर्वे, प्रविण पोवार, रमेश साळोखे, पिंटू काटकर, अक्षय वाळवेकर, महेश नलवडे, बंडा साळोखे, महेश जाधव, अशोक देसाई, राजू माने यांच्यासह परिसरातील विविध तालीम आणि सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.