कोल्हापूर : सतेज पाटील यांनी विचार करावा, अजूनही 24 तास शिल्लक आहेत, जयश्री जाधव यांना भाजपाची उमेदवारी द्यावी. आम्ही सत्यजित कदम यांना थांबवतो. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, अशी ऑफर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काँग्रेसला दिली.
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी चंद्रकांतदादा पत्रकाराशी बोलत होते.
चंद्रकांतदादा म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील म्हणतात भाजपाने ही निवडणूक लादली आहे. मात्र ही निवडणूक काँग्रेसनेच लादली आहे. अर्ज भरण्यासाठी अजूनही 24 तासाचा कालावधी शिल्लक आहे. जयश्री जाधव यांना भाजपाची उमेदवारीमध्ये द्या. आम्ही नाना कदम यांना थांबवतो. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल.