घानवडेच्या उपसरपंचपदी साताप्पा चौगले बिनविरोध

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत घानवडेच्या उपसरपंचपदी साताप्पा विठ्ठल चौगले (मांजरवाडी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश कांबळे होते.

   यावेळी नुतन उपसरपंचपदी निवड झालेनंतर चौगले यांना श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे चौगले यांनी सांगितले.

      यावेळी बळवंत पाटील, एकनाथ पाटील, बाबुराव पाटील, आर. एस. गोते,  ,शहाजी वीर, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, पुनम परीट, सविता पाटील कल्पना चव्हाण ,छाया पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामसेविका सुनिता गिरीबुवा यांनी मानले‌.