इचलकरंजीत महिला कामगारांचा मोफत विमा उतरविणार


इचलकरंजी (प्रतिनिधी) : आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इचलकरंजी व परिसरातील महिला कांडी कामगारांचा एक लाखाचा अपघाती विमा दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन उतरविणार आहे.

आमदार प्रकाशराव आवाडे महिला कांडी मोफत कामगार सुरक्षा विमा कवच ” या नावाने ही योजना दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन दि ओरियंटल इन्शुरन्स कंपनीची विमा पॉलिसी सुरू करीत असून इचलकरंजी व परिसरातील सर्व महिला कांडी कामगारांनी किंवा त्यांच्या कारखानदार मालकांनी दि. ३१ मार्च पूर्वी नोंद करावी, असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केले आहे.