स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर: महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

आज या आंदोलनाचा नववा दिवस आहे तरीदेखील महाविकास आघाडी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहेशेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून येणाऱ्या चार फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर लोकप्रतिनिधींना सार्वजनिक कामात सहभागी होऊ देणार नाही, असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.