कोल्हापूर : ओबीसींची जातवार जनगणना केल्याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक घेण्यात येऊ नये, या मागणीसाठी ओबीसी जनमोर्चा संघटनेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेवर सोमवारी मोर्चा काढण्यात आला.
शाहुपुरीतील ओबीसी जनमोर्चा जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला. महापालिकेच्या गेटवर हा मोर्चा अडवण्यात आला.
यावेळी ओबीसींची जातवार जनगणना करून ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन उपायुक्त विनायक औंधकर यांना देण्यात आले.मोर्चाचे नेतृत्व माजी महापौर नंदकुमार वळंजू, माजी नगरसेविका उमा बनसोडे, दिगंबर लोहार, ज्ञानेश्वर सुतार, प्रमोद सूर्यवंशी आदींनी केले.