गडहिंग्लज: गडहिंग्लज साखर कारखान्याचा एकमताने ठराव करूनही मी मनमानी का कारभार केला असा खोटा आरोप करून कारखाना बंद पाडण्याचा विरोधकांनी डाव असल्याचा आरोप कारखान्याचे चेअरमन श्रीपत रावजी शिंदे यांनी कआज पत्रकार परिषदेत केला .
पत्रकबाजी करून कारखाना मोडीत काढण्याचा डाव विरोधकांनी चालवला आहे ब्रिक्सकंपनीने चालविण्यास कारखाना घेतला ..तर शहापूरकर व राष्ट्रवादीने हे कारखाना बंद पाडण्याचा घाट घातला आहे पण सुज्ञ जनता त्याला भीक घालणार नाही अशी सडकून टीका शिंदे यांनी केली .विरोधकांनी कामगारांना हाताशी धरून बॉयलर बंद पाडण्याचा प्रयत्न केला.वजन काटा मारला जातो असा खोटा आरोप करून कारखाना बदनाम करण्याचा हा डाव विरोधकांनी साधला आहे.
मोठ्या सेवा संस्था पतसंस्था यांनी मदतीचा हात दिला पण जिल्हा बँकेसह मोठ्या बँकांनी मदतीचा हात दिला नाही आम्ही सहा संचालकांनी मदतीची याचना केली व पैसे मिळवून कारखाना चालू केला पण विरोधकांनी हा कारखाना बंद कसा पडेल यासाठी खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला असा घणाघाती आरोप श्रीपतराव शिंदे यांनी केला विरोधी संचालकांपैकी क क्रांती कुराडे सुभाष शिंदे दीपक जाधव जयश्री पाटील प्रकाश पठाडे या संचालकांनी कारखान्यास एक कांडे ऊस घातला नाही मग हेकारखाना कसा वाचवणार किंवा चालणार .असा आरोप केला.राज्यात महाविकासआघाडी असताना भाजप व राष्ट्रवादी हे कसे काय साखर कारखान्यात एकत्र कसे असा सवाल करून मुश्रीफ यांनी आता विचार करण्याची गरज आहे.हे सत्तेचे गुलाम गुलाम व दलाल आहेत।शेतकरी सभासद याचे योग्य वेळी उत्तर देतील असे शिंदे म्हणाले मतलबी स्वार्थी मंडळी यांनी कारखान्याची वाट लावली असा आरोप केला.
अकरा महिने कामगारांचा पगार नाही पण स्वाभिमानी कामगारानी एक महिन्याचे दिले पण.स्वार्थी मतलबी मंडळी हे कारखान्याची वाट लावायला चाललेत ऊस उत्पादकांनी कामगारांच्या चुलीत पाणी भरण्याचे काम यांनी केल्याने याला जनता कधीच क्षमा करणार नाही असा घणाघाती आरोप श्री शिंदे यांनी केला या पत्रकार परिषदेला कारखान्याचे संचालक अमरसिंग चव्हाण संभाजी नाईक बाळकृष्ण परीट माजी संचालक श्रीपती कदम उपस्थित होते. बाळ नाईकयांनी स्वागत केले.