एसटी विलीनीकरण संदर्भात उच्च न्यायालयात आज सुनावणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर आज उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी होणार आहे.

शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरु आहेत. या संपकाळामध्ये एसटीचे १,६०० कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. संपावर तोडगा काढण्यात एसटी महामंडळाला यश आलेले नसून आज उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. संप सुरु झाल्यानंतर आज ११८ व्या दिवशी या प्रकरणावर न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे.

विलीनीकरणासंदर्भातील अहवाल आज न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे.१ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत नुकसानविलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी सेवा बंद झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारातून खासगी बसगाड्या, शालेय बस आणि वडाप वाहतुकीला परवानगी देण्यात आली. संप चिघळल्याने प्रवाशांचे हाल सुरूच राहिले आणि एसटीचे नुकसान वाढतच गेल़े नोव्हेंबर २०२१ पर्यंत संपामुळे एसटीचे ४३९ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न बुडाले होते. त्यात आणखी वाढ झाली असून, ते १ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली आहे.