कोल्हापूर : राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी अंबाबाईची विधीवत पुजा देखील केली.
त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमच्या हातून सामाजासाठी चांगले काम घडावे असे मागणं अंबाबाई चरणी मागितल्याचे त्यांनी सांगितले. काल संध्याकाळपासून आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले आहेत. त्याठिकाणी ते अदिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाच्या बाबतीत चर्चा करणार आहेत.