गगनबावडा वासियांना आधार अपडेट साठी दुसऱ्या तालुक्यात जावे लागणारे थांबणार कधी ?

गगन बावडा प्रतिनिधी: दिगंबर म्हाळुंगेकर

गगनबावडा तालुक्यातील नागरिकांचे आधार कार्ड काढलेले आहे परंतु ते अपडेट नसल्याने आधार कार्ड “असून अडचण आणि नसून खोळंबा ” असल्यासारखे झाले आहे यासाठी नागरिकांना अनेक ठिकाणी बऱ्याच अडचणी येत असून ते अपडेट करण्यासाठी गगनबावडा तालुका सोडून बाहेरील तालुक्यात जाऊन तास न तास रांगेत उभे रहावे लागत आहे .

गगनबावडा तालुक्यामध्येआधार कार्ड नवीन काढणे , आधार कार्ड काढलेले आहे परंतु त्यामध्ये नाव , जन्मतारीख, पत्ता व फोटो याबाबत चुका झालेल्या आहेत अश्या नागरिकांचे आधार कार्ड शिवाय कोणतेही काम होत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गगनबावडा तालुक्यात आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा कोठे ही नाही आणि त्यासाठी नागरिकांना पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे त्याचबरोबर राधानगरी तालुक्यातील धामोड येथे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कोल्हापूर येथे जाऊन कार्ड अपडेट करणे किंवा नवीन काढावे लागते यामध्ये नागरिकांचा वेळ पैसा याचा नाहक भुर्दंड व मानसिक त्राससहन करावा लागतो तरी आधार कार्ड सुविधा अपडेट व नवीन काढण्यासाठी तालुक्यांमध्ये व्हावी अशा आशयाचे निवेदन गगनबावडा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट शाखा गगनबावडाचे अध्यक्ष विठ्ठल लटके , सचिव मारुती गावकर , अशोक महाडिक , मनोहर बोरये , गोविंद तटकरे व सुरेश वरेकर यांनी दिले . त्याच बरोबर अशाच आशयाचे निवेदन तालुका गट विकास अधिकारी माधुरी परीट यांनाही देण्यात आले .