मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छत्रपती संभाजिराजे आक्रमक

कोल्हापूर | मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी महत्त्वाची घोषणा केल्याचं समोर आलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले असल्याचं पहायला मिळत आहे. येत्या 26 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा, संभाजीराजे यांनी दिला आहे.मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं संभाजीराजे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पुन्हा मराठा आरक्षणावरुन वाद चिघळण्याचं चित्र पहायला मिळणार असल्याचं दिसतंय.दरम्यान, मराठा समाजाला, गरिब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हे आंदोलन करत आहे, असं संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. त्यामुळे आता सरकार यासंदर्भात काय निर्णय घेणा हे महत्त्वाचं ठरणार आहे.