बहिरेश्वर: रोटरी क्लब कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा नेशन बिल्डर अवाॅर्ड बहिरेश्वर गावातील श्री संजय महादेव कांबळे यांना देण्यात आला .
ते सध्या ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी बीड शेड येथे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. हा पुरस्कार अध्यापन कौशल्य, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम ,परीक्षा नियोजन ,सामाजिक सहभाग आदी कार्य कुशलता पाहून पी डी जी संग्राम पाटील यांचे हस्ते देणेत आला.. याप्रसंगी ज्ञान विज्ञान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुर्यकांत दिंडे,रवि जाधव,एम वाय पाटील,करुणाकर नायक,आदी उपस्थित होते.