कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध क्रीडा स्पर्धांना कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज क्रिकेट स्पर्धेच्या सामन्याची सुरुवात कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानामध्ये झाली.
या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) मनीषा देसाई व कर्मचारी उपस्थित होते.आज झालेल्या सामन्यांमध्ये राधानगरी विरुद्ध मुख्यालय क्र.४ यामध्ये राधानगरी संघ ८ गडी राखून विजय झाला.भुदरगड विरुद्ध मुख्यलाय क्र.२ मध्ये भुदरगड संघाने ७४ धावानी विजयी प्राप्त केला.
आजरा विरुद्ध कागल या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात कागल संघाने ५ गाडी राखून विजयी मिळवला.हातकणंगले विरुद्ध गगनबावडा हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. यामध्ये हातकणंगले संघाने 15 धावांनी विजय मिळवला. या सामान्यांसाठी पंच म्हणून मयूर चव्हाण, अभिजीत पाटील, जगदीश चव्हाण, सचिन पाटील यांनी काम पाहिले. त्याचबरोबर क्रिकेट नियोजन समितीचे कामकाज अजय शिंदे, राहुल मोरे, आर आर पाटील, उत्तम वावरे, सत्तापा हजारे, बंडा पाटील, भास्कर भोसले यांनी पाहिले.