कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना १२ तासा ऐवजी आता आठ तासाचे कर्तव्य (ड्युटी) बजावण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या.
कोल्हापूर – जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना १२ तासा ऐवजी आता आठ तासाचे कर्तव्य (ड्युटी) बजावण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या.त्यामुळे महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण कमी होऊन त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे.महिला पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्याबरोबर कौटुंबिक व पारंपारिक जबाबदाऱ्याही पेलाव्या लागतात. पण त्यांना १२ तासाचे कर्तव्य बजावताना कामाचा ताण येत होता. त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होता. त्यामुळे त्यांच्या रजेचेही प्रमाणही वाढले जायचे. कामाचा हा ताण कमी करण्यासाठी राज्य पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याचे तास कमी करण्यावर विचार झाला होता. त्याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले होते. दरम्यान अधीक्षक बलकवडे यांनी आज प्रायोगिक तत्वावर यासंबधीचे आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.