दोनवडे : खुपिरे (ता. करवीर) येथील बलभीम विकास सेवा संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी बलभीम शेतकरी विकास पॅनेल आणि विरोधी बलभीम बचाव परिवर्तन पॅनेल अशी दुरंगी लढत होत आहे.
संस्थेच्या १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. रविवार दि. ३० रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सायंकाळी मतमोजणी होणार आहे. संस्थेचे ६१८ सभासद आहेत. संस्थेवर प्रशासक आहे.
निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी गटात टोकाची इर्षा आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील करत आहेत. बलभीम शेतकरी विकास पॅनेल उभे केले आहे. विरोधी बलभीम बचाव परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व सरदार बंगे, सनी पाटील, प्रकाश चौगले करत आहेत.