कोल्हापूर : महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या तिन्ही लाटेत रुग्णांवर उपचार झाले. यात या ठिकाणी सुमारे ५० रुग्ण हे हाय रिस्कमधील होते. त्यांना व्हेंटिलेटर लावला होता.मात्र, येथील डॉक्टरांच्या उपचारांमुळे त्यांना जीवदान मिळाले.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात आयसो
शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात आयसोलेशन हॉस्पिटल आधार बनले.सरकारी रुग्णालये म्हणजे गैरसोय असे चुकीचे समीकरण समाजात रूढ झाले आहे. मात्र, कोरोना काळात याच शासकीय रुग्णालयांची आवश्यकता सर्वांच्याच लक्षात आली. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. आयसोलेशन हॉस्पिटलमधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन येथे २ मजलेही वाढवले.ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची सुविधाही उपलब्ध करून दिली. तिन्ही लाटेत येथे सुमारे ५० रुग्ण हाय रिस्कचे होते. त्यांना सातत्याने व्हेंटिलेटर लावला होता. येथील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे हे रुग्ण बरे झाले. यातील बहुतांशी रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची होती. खासगी रुग्णालयातील महागडे उपचार त्यांना परवडणारे नव्हते. अशा काळात आयसोलेशन रुग्णालय त्यांच्यासाठी आधारभूत ठरले असून, अत्यल्प खर्चामध्ये त्यांना सर्वोत्तम उपचार मिळाले.