इचलकरंजी/ मन्सूर अत्तार: इचलकरंजी जवळ असलेल्या तारदाळ येथील आवाडे टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. स्फोट झाल्याने आगीचे रौद्ररुप धारण केले आहे.
फॅक्टरीला आग लागल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे कळते. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.ही आग इतकी मोठी होती की लांबून धुराचे लोट दिसत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.