करमाळा: मोठ्या संख्येने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामध्ये सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकासह यांच्यासह 13 जणांचा समावेश आहे . या सर्वांचे स्वागत व सत्कार सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केला.
प्रवेश केलेल्यामध्ये सेवा सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम ज्ञानू पाटील, उपाध्यक्ष हणमंत कृष्णा पाटील, सदस्य महादेव गणपती पाटील यांच्यासह शुभंम शिवाजी पाटील, उत्तम गणपती पाटील, धिरज संजय पाटील, संजय कृष्णा पाटील, सुरज दिलीप पाटील, सुरज तुकाराम पाटील, स्वप्नील तुकाराम पाटील, नानासो व हणमंत ज्ञानू पाटील, तानाजी कृष्णा मोहिते यांचा समावेश आहे. यावेळी विश्वासचे संचालक बाळसाहेब पाटील व सुकूमार पाटील तसेच विश्वास पाटील, राजारामबापू दुध संचालक संचालक बंडोपंत नांगरे, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, सरपंच संध्याताई कदम यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, नेतेमंडळी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.