कोल्हापूर: कोरोना महामारीमध्ये मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या काळात जिल्हा लेखा व्यवस्थापक नितीन लोहार, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांनी संगनमत करून अधिकाराचा गैरवापर करून ३५ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे वित्त व लेखा संचालक यांना विश्वजीत जाधव यांनी दिले आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी राहूल रेखावर, सीईओ संजयसिंह चव्हाण यांना जाधव यांनी आज (मंगळवारी) दिली. यावेळी माणिक देसाई यश मिरजे, गौरव पाटील, उन्मेश वाघमोडे, मयुर शिंदे, सुमीत पवार आदी उपस्थित होते.