मंत्रालयातील बैठकीत लॉकडाउनबद्दल महत्वपूर्ण निर्णय
मुंबई: संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बैठकीकडं लागलं होतं, ती मंत्रालयातील बैठक नुकतीच संपलीय. सध्या राज्यात कोरोनाचं संकट अधिक गडद होत असून मंगळवार व बुधवारी कोरोनाच्या तब्बल 19 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडलीय.
याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं आज वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी विभागाचे सचिव, संचालय यांच्याकडून कोरोनाबाबत आढावा घेण्यात आल्याचे राज्याचे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. देशमुख पुढे म्हणाले, महाराष्ट्रात तूर्तास लाॅकडाउनची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलंय. परंतु, आपल्याला यावरती कोणते निर्णय घ्यावे लागतील याची चर्चा सुरुय. राज्यात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असून याची नोंद घेतली आहे.
सध्या उपचार व्यवस्था आहे. मात्र, यात मार्डच्या मागणीबाबत चर्चा झाली असून त्यावर देखील आम्ही उपाय शोधू, तसेच सर्व संघटनांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याबाबत आम्ही भूमिका घेतलीय.