गगनबावडा : पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्वच उमेदवार बहुमताने विजय होतील, असा विश्वास व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गगनबावडा येथील माधव विद्यालयात आज (बुधवार) सकाळी मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकाळी ९ वाजता माधव विद्यालयात दाखल होत मतदानाचा हक्क बजावला.