हसन मुश्रीफ ,संजय मंडलिकांनी मतदानाचा हक्क बजावला ….

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी आज सकाळ पासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे . तर सकाळच्या सत्रात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

आहे . तसेच सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यानी पिवळ्या टोप्या घालून मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे.

निवडणूक रिंगणात ३३ उमेदवार उतरले असून ,अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीत शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली समविचारी पक्षांचे एकत्रित पॅनेल रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत रंगतदार चुरस निर्माण झाली आहे. विकास संस्था गटातील सहा जागा ह्या बिनविरोध झाल्या असल्या ,तरी त्या तालुक्यात मतदारांना राखीव जागांवरील उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. मतदानासाठी कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील मतदारांसाठी शहरात एक आणि अन्य ११ तालुक्यात ३९ केंद्रावर मतदानाची सोय केली आहे.