कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी लोकसंख्येनुसार आरक्षण ठरले असून,.अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी आता 12 जागा असणार आहेत. महापालिकेच्या आता पर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या निवडणुकीसाठी अनुसूचित आणि जमातीसाठी एसटी आरक्षण मिळणार आहे..
एसटी आरक्षणा बाबत प्रवर्ग जागा निर्माण झाली असून, एकूण लोकसंख्येच्या 0.5 टक्क्यावर लोकसंख्या झाली आहे आता प्रवर्गासाठी खुल्या 79 जागा असणार आहेत. लवकरच हा अहवाल राज्यनिवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार असून ,आयोगाच्या सूचनेनुसार या महिन्यातच आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे. आता राज्यशासनाच्या आदेशानुसार महापालिकेची निवडणूक त्रिसदस्य पद्धतीनुसार होत असून त्यात 31 प्रभाग असून , शहरातून 92 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत.