कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मा.आ.महादेवराव महाडिक व मा.आ. अमल महाडिक यांनी जिल्हा बँकेसाठी मतदानाचा हक्क बजावला.महाडिक पिता-पुत्रांनी हातकणंगले येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
हातकणंगले येथे संस्था गटातून व कोल्हापूर येथे प्रक्रिया गटातून मतदान असल्याने महादेवराव महाडिक सकाळी लवकरच हातकणंगले मतदान केंद्रावर दाखल झाले. मतदानानंतर उपस्थित सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांशी संवाद साधून, शुभेच्छा देऊन ते पुढे कोल्हापूरला रवाना झाले. अमल महाडिक यांची आधीच जिल्हा बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे. तरी आघाडीच्या इतर उमेदवारांसाठी ते सातत्याने प्रचार यंत्रणेत सक्रिय होते.
आज मतदानाच्या दिवशीसुद्धा हातकणंगले केंद्रावर उमेदवार प्रतिनिधी म्हणून अमल महाडिक पूर्णवेळ थांबून आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहणे आणि सर्वांशी विनम्रतेने वागण्याच्या त्यांच्या स्वभावाविषयी केंद्रावर चर्चा सुरू असलेली पाहायला मिळाली.यावेळी केंद्रावर छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार सर्वश्री आ. प्रकाश आवाडे, आ.राजू आवळे, मा.खा.निवेदिता माने तसेच राजाराम कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, सुरेश पाटील, मकरंद बोराडे व कार्यकर्ते उपस्थित होते.