कोल्हापूर : शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय आहे, महापालिकेचा निधी केवळ पगारावरच खर्च करता का? अशी विचारणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठकीत केली.
रस्त्यांसाठी २५ कोटींची तरतूद करा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. महापालिकेतील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री पाटील यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, शहरात सध्या जी कामे सुरू आहेत, ती राज्य आणि केंद्र सरकाराच्या निधीतून सुरू आहेत. महापालिकेचे म्हणून कामे दिसत नाहीत. शहरात रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. पालकमंत्री म्हणून मी जिल्हा नियोजन मंडळातून काही निधी एप्रिलपर्यंत देणारच आहे. प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे आणि संजय सरनाईक यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट केले. थेट पाइपलाइन योजनेतील जॅकवेल कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. सध्या डी वॉटरीगचे काम सुरू आहे. २४पर्यंत प्रत्यक्ष जॅकवेल कामाला सुरुवात होईल.