जि.प. कर्मचारी सोसायटीला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सदस्य यांची सदिच्छा भेट.

कोल्हापूरजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला आज जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्यासह विविध सभापतींनी सदिच्छा भेट दिली.

 

 

 

यावेळी महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, शिक्षण व अर्थ सभापती शितल यादव, बांधकाम सभापती सारिका नांदेकर, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, सदस्य सुवर्णा कांबळे आणि राजश्री गावडे उपस्थित होत्या.

संस्थेची माहिती चेअरमन संजय शिंदे, संचालक अजय शिंदे, रणजित पाटील आणि उत्तम वावरे यांनी दिली. पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेने नव्याने सुरू केलेल्या अभ्यासिकेला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आणि सभासदांच्या मुलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

🤙 8080365706