शेतकरी, दूध उत्पादक आणि कष्टकऱ्यांच्या विकासासाठी शाहू शेतकरी समविचारी कटिबद्ध: आ. सतेज पाटील

कोल्हापूर :गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आ . सतेज पाटील यांनी गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी, दूध उत्पादक आणि ठरावधारकांची भेटी घेतल्या. या दरम्यान या दौऱ्यात संग्राम कुपेकर, प्रकाश गाताडे, प्रकाश चव्हाण, स्वाती कोरी, प्रकाश पाटील, संजय बटकडली, अॅड. बाळासाहेब पाटील, बाळेश नाईक, रविंद्र धरणगुत्ते याची भेट घेतली. तसेच लिंगनूर येथील  अशोक नागू कुरळे या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठा प्रकल्पाला भेट देऊन कुरळे दाम्पत्यांस शुभेच्छा दिल्या.

 

 

गोकुळची निवडणूक साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या संसारासाठी निर्णायक आहे. आज प्रत्येक १ रुपयातील ८५.७० पैसे दूध उत्पादकांना परत मिळतात; पुढे हे प्रमाण ९० पैशांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. शेतकरी, दूध उत्पादक आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी एकनिष्ठ असलेल्या शाहू शेतकरी समविचारी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन यावेळी केले.

 

यावेळी संग्रामसिंह नलावडे, श्रीमती अंजनाताई रेडेकर, रामराजे कुपेकर, विद्याधर गुरबे, दिग्विजय कुराडे, गणपतराव डोंगरे, पुंडलिक झुरे, प्रशांत देसाई, रामदास पाटील, नागराज जाधव, शिवाजी सावंत, अजित बंदी, किरण पाटील, बसवराज चराटी, शेखर पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

🤙 8080365706