कोल्हापूर : जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे *सद्भावना दिवसानिमित्त* गुरुवार, दि. 20 ऑगस्ट 2026 रोजी सद्भावना शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या *तळमजल्यावर आयोजित कार्यक्रमात मा. श्री. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी* यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सद्भावना दिवसाची शपथ घेतली.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी *जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा यांचा भेद न करता सर्व भारतीयांचे भावनिक ऐक्य व सामंजस्यासाठी कार्य करण्याची तसेच आपापसातील मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संवाद व संविधानिक मार्गाने सोडविण्याची* प्रतिज्ञा केली.
सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने दरवर्षी *20 ऑगस्ट हा दिवस ‘सद्भावना दिवस’* म्हणून पाळण्यात येतो.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
