आ. अमल महाडिक यांच्या हस्ते छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ध्वजारोहण

कोल्हापूर:भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आ . अमल महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

 

 

कारखाना संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता बनण्याच्या स्वप्नपूर्तीकडे भारताची वाटचाल दिमाखात सुरू आहे. देशभरात सुरू असलेले विकासाचे नवनवीन प्रकल्प, आर्थिक सुधारणा, मजबूत संरक्षण यंत्रणा यामुळे येणाऱ्या पिढीसाठी आशादायक चित्र निर्माण झाले आहे. भविष्यकाळात भारत जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास येईल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यासह सर्व संचालक मंडळ,अधिकारी आणि कामगार वर्ग उपस्थित होता.

🤙 8080365706