इचलकरंजीतील राजाराम स्टेडियमवर स्वातंत्र्य दिनाचा भव्य सोहळा उत्साहात संपन्न!

कोल्हापूर:स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने इचलकरंजी महापालिकेच्या वतीने राजाराम स्टेडियम येथे भव्य ध्वजारोहण सोहळा देशभक्तीपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते आणि आ . राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राध्वजारोहण सोहळा उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

 

राष्ट्रध्वज फडकताच ‘जन गण मन’च्या स्वरांनी आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक एनसीसी पथसंचलनाने उपस्थितांची मने जिंकली. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष रंगत आणली.

 

यावेळी उपमहापौर, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706