नंदुरबार : महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागांतर्गत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नंदुरबार विभागाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला होता.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत तसेच लोकसभा सदस्य अॅड. गोवाल पाडवी यांच्या शुभहस्ते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, किशोर दराडे, विधानसभेचे सदस्य विजयकुमार गावित, राजेश पाडवी, विधान परिषद सदस्य अमरिशभाई पटेल, सत्यजीत तांबे, विधानसभेचे सदस्य शिरीषकुमार नाईक, आश्रय पाडवी यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच धर्मादाय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यात सार्वजनिक न्यास नोंदणीशी संबंधित कामकाजासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालयीन इमारत उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना तसेच विविध सार्वजनिक न्यासांना अधिक सुलभ आणि प्रभावी सेवा मिळण्यास मदत होणार आहे. या नवीन इमारतीमुळे कार्यालयीन कामकाजाला अधिक गती मिळून नागरिकांच्या सुविधा वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हा भूमिपूजन सोहळा नियोजित सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सर्किट नं. १४, आर. दुग्ध भवन शेजारी, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपन्न झाला.
