कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!

कोल्हापूर:आज ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री  नामदार प्रकाश आबिटकर साहेब यांच्या शुभहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण अत्यंत उत्साहात पार पडले.

 

 

या मंगलप्रसंगी खासदार शाहू महाराज, खा . धनंजय महाडिक, मंत्री प्रकाश आबिटकर,महापौर  रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी मा. डॉ. विजय राठोड आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, पोलीस दल, स्वातंत्र्यसैनिक, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या मुखातून निघालेल्या राष्ट्रगीताच्या स्वरांनी आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर देशभक्तीच्या भावनेने उजळून निघाला.

 

स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या तमाम वीर हुतात्म्यांना आणि देशरक्षणासाठी सज्ज असणाऱ्या जवानांना विनम्र अभिवादन!

 

🤙 8080365706