काँग्रेस विचारांसाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी लढत राहण्याचा निर्धार : आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश न मिळालेल्या काँग्रेस उमेदवांराची बैठक झाली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज संजय पाटील यांच्यासह आ.सतेज पाटील उपस्थित राहून उमेदवारांना संबोधित केले.

महापालिकेतील अपयश पुढील संघर्षासाठी मिळालेला अनुभव आहे. यापुढे नव्या ताकदीने आणि उमेदीने काँग्रेसच्या विचारांसाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार सर्व उमेदवारांनी केला.

यावेळी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, भुपाल शेटे, राजू दिंडोर्ले यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

🤙 8080365706