कोल्हापूर:कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने कागल नगरपरिषद कागलच्या नूतन नगराध्यक्षांसह नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
नुतन नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचे आणि कागल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष नवल बोते, चंद्रकांत गवळी, अशोक जकाते, रणजीत बन्ने, सौरभ पाटील, सुनील माने, अस्लम मुजावर, विवेक लोटे, संजय फराकटे यांच्यासह इतर मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच नगरसेवक यांच्यासह सत्कार समारंभाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
