मुंबई:राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याकरिता राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आ . सतेज पाटील उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री एड. यशोमती ठाकुर, खासदार चंद्रकांत हंडोरे. प्रणिती शिंदे, माजी आमदार अरिफ नसीम खान, निवड समितीचे उपाध्यक्ष एड. गणेश पाटील यांच्यासह राज्यभरातील निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.
