कागलच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरमध्ये बुधवारीश्री स्वामी समर्थ यांच्या चरण पादुकांचा दर्शन सोहळा

कोल्हापूर:श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या पवित्र पादुका अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांना प्रदान केल्या आहेत. त्या अक्कलकोट राजघराण्याकडून श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या पुढाकाराने प्रथमच कागल व परिसरातील भाविकांना दर्शनासाठी आणण्यात येणार आहेत.

या पवित्र पादुकांचा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील भाविकांसाठी दिव्य दर्शन सोहळा दौरा सहा डिसेंबरपासून सुरु आहे.कागल नगरीत बुधवारी सकाळी आठ वाजता या पादुकांवर छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज, कागल सिनियर यांच्या वतीने सकाळी आठ वाजता सात मोटेची विहीर येथील बंगल्यात अभिषेक होईल.त्यानंतर नऊ वाजता बसस्थानक शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या पवित्र पादुकांचे आगमन होईल. तिथून सजविलेल्या पालखीतून टाळ मृदुंगाच्या गजरात श्रीराम मंदिरमध्ये या पादुका आणण्यात येतील.येथे विधिवत पूजन करण्यात येईल आणि त्यानंतर भाविकांना दर्शन व कृपाआशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी श्रीराम मंदिरमध्ये विधिवत विराजमान करण्यात येतील. सायंकाळी आठपर्यंत भाविकांना पादूका दर्शन घेता येणार आहे.

 

अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे जवळचे ऋणानुबंध

छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज, कागल सिनियर सरकार प्रवीणसिंहराजे घाटगे,समरजितसिंहराजे घाटगे व विरेंद्रसिंहराजे घाटगे यांच्या पुढाकाराने कागलमध्ये या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कागलचे घाटगे व अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे जवळचे ऋणानुबंध आहेत. कागल जहागिरीच्या राजमाता व प्रवीणसिंहराजे घाटगे यांच्या मातोश्री स्व. विजयादेवी घाटगे यांचे माहेर अक्कलकोटच्या भोसले घराण्यातील आहे. तसेच श्रीमंत पिराजीराव महाराज यांच्या ज्येष्ठ सुकन्या ताराराणीदेवी अक्कलकोटच्या भोसले घराण्यातील स्नूषा असून तिसरे फत्तेसिंह महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.

 

🤙 8080365706