कोल्हापूर:के.. के.एम.टी.च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्यास यशस्वी पाठपुरावा केल्या बद्दल के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी निशिकांत सरनाईक, अंकुश कांबळे, प्रताप येतवडे, इरशाद नायकवडी, गुंडू होसुरे, जावेद सनदी, शंकर कोटलगी, तानाजी पाटील, संभाजी बुडके, मैनुद्दीन मुल्लाणी आदी के.एम.टी. कर्मचारी उपस्थित होते.
