तीन ते चार पटींनी अचानक वाढवलेली पाणीपट्टी अवास्तव असून उद्योगांवर अन्याय करणारी : आ. सतेज पाटील 

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तीन ते चार पटींनी अचानक पाणीपट्टी वाढवली आहे. यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत सभागृहाचं लक्ष वेधलं. महामंडळाने उद्योगांना विश्वासात न घेता अवास्तव वाढवलेली ही पाणीपट्टी उद्योगांवर अन्याय करणारी आहे असं सतेज पाटील यांनी म्हटलंय.

राज्यात जलसंपदा विभागाकडून पाणीपट्टीत होत असलेली वाढ आणि विजेचा वाढलेला खर्च यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणीपट्टीत वाढ केली. या पाणीपट्टीचा सुधारित दर 1 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात आला. ही औद्योगिक विकास महामंडळाने केलेली वाढ अवास्तव असून उद्योगांवर अन्यायकारक ठरणारी आहे. याचा विपरीत परिणाम उद्योगांवर होणार असल्याचही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी म्हटलय.

या अवास्तव पाणीपट्टीचे दर कमी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सावंत म्हणाले की, महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या एकूण देखभाल व दुरुस्तीच्या खर्चापैकी पाणीपट्टी स्वामित्व धनाचा खर्च व वीज देयका पोटीच्या खर्चाचा वाटा साधारण 65 टक्केच्या दरम्यान असल्याचं सांगितलं. पाणीपट्टी वाढ केली असून ही अवास्तव नसल्याचा दावा यावेळी मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

 

🤙 8080365706