मनाेहर गाेपाळ जाेशी यांना ’लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार

कुंभोज(विनोद शिंगे)
साखर उद्याेगातील चार दशकाहून अधिक कामकाज आणि उल्लेखनीय याेगदानाची दखल घेत शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट्स असाेसिएशन ऑफ इंडिया ( (STAI) ) या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनाेहर गाेपाळ जाेशी यांना ’लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार’ जाहीर केला आहे. हा पुरस्कार 25 जुलै राेजी नवी दिल्ली येथील भारत मांडपम कन्व्हेन्शन सेंटर येथे हाेणाèया शताब्दी वार्षिक अधिवेशनप्रसंगी प्रदान करण्यात येणार आहे.

 

एसटीएआय ही संस्था साखर उद्याेगाशी संबंधित तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, अभियंते व व्यवस्थापनतज्ज्ञ यांचे प्रतिनिधित्व करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1925 साली झाली असून 100 वर्षांपासून ही संस्था साखर उद्याेगाच्या तांत्रिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. साखर उत्पादन, प्रक्रिया, ऊर्जा कार्यक्षमता, पर्यावरणीय शाश्वतता यांसारख्या विविध क्षेत्रात मार्गदर्शनपर कार्यशाळा, संशाेधन परिषद आणि प्रकाशने याद्वारे उद्याेगाला दिशा देत आहे. यावर्षी एसटीएआय आपली शताब्दी साजरी करत असून अशा ऐतिहासिक प्रसंगी हा पुरस्कार मिळणे ही अत्यंत गाैरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.
श्री.जाेशी यांनी सहकारी साखर उद्याेग, सहकारी बँकिंग व ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रात चार दशकाहून अधिक काळ उल्लेखनीय याेगदान दिले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या कार्यामुळे साखर उद्याेगांना नवी दिशा व ऊर्जा मिळाली आहे. त्यांचा सहकार्यशील दृष्टीकाेन, नवविचार व कार्यक्षम नेतृत्व यामुळे आणि त्यांनी ऊर्जा कार्यक्षमतेसाठी केलेल्या नवकल्पनांना अनेक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार लाभले आहेत. या पुरस्कारांबद्दल सहकारी क्षेत्र, साखर उद्याेग, आणि वित्तीय व औद्याेगिक वतुर्कात सर्वत्र मा. जाेशी यांचे अभिनंदन व काैतुक व्यक्त केले जात आहे. या सर्व यशामागे कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादा, मार्गदर्शक प्रकाशआण्णा आवाडे, आमदार राहूल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासाे चाैगुले तसेच सर्व संचालक मंडळाचे माेलाचे सहकार्य व प्रेरणा लाभली आहे.

🤙 9921334545