प्रतिनिधी सुदर्शन पाटील
घुंगुंर ता.शाहूवाडी (सावरेवाडी) येथे आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर व भैरवनाथ अर्थमूव्हर्स अँड कंपनी यांच्या वतीने बॉक्साइट खान प्रकल्पाबाबत लोक सुनावणी आज सकाळी साडेदहा वाजता अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी समीर शिंगटे, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे, नायब तहसीलदार गणेश लव्हे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सह पंचक्रोशीतील नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला .
यावेळी काही स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पामुळे ग्रामीण डोंगराळ भागातील विकासाला चालना मिळवून बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल असे मत व्यक्त करून या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला.
तर काहींनी पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा प्रश्न उपस्थित करून वरिष्ठांच्या जवळ आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी अपर जिल्हा अधिकारी संजय तेली म्हणाले अतिशय पारदर्शक पद्धतीने आजची आम्ही जन सुनावणी घेतली उपस्थित लोकांनी आपआपल्या ज्या काही रोखठोक भूमिका मांडल्या यामध्ये प्रामुख्याने पंचक्रोशीतील नागरिक गावकरी महिला यांनी आपला सहभाग नोंदवला या जन सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे आम्ही सगळ्यांच्या भावना ऐकल्या या बाबतचा संपूर्ण अहवाल आम्ही एक दोन दिवसात शासन स्तरावर पाठवू .
यावेळी कंपनी भागीदार युवराज पाटील म्हणाले, की देशहितासाठी हा रोजगार होणे आवश्यक असून देशाच्या विकासामध्ये खनिजाचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचा असून जर हा प्रकल्प झाला तर ग्रामीण भागातील व पंचकोशीतील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यातून मिळालेल्या रॉयल्टीतून विकासाची कामे निर्माण होतील तरुणांना काम आणि या भागाचा विकास या दृष्टिकोनातून ही कंपनी शासनाच्या अटी शर्तीची पूर्तता करून लवकरच सुरू होईल असे त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड, माजी उपसभापती महादेवराव पाटील,ए वाय पाटील, सरपंच शुभांगी कांबळे, कल्पना पाटील संदीप केसरकर, तानाजी रवंदे, मानसिंग सावरे, माजी सरपंच बाजीराव सावरे,पांडुरंग खोत, यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभाग नोंदवून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी डीवायएसपी आप्पासो पवार व शाहुवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे व अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड पोलीस बंदोबस्त होता.