कुंभोज ( विनोद शिंगे)
माजी खा. अण्णासाहेब जोल्ले व आ. शशिकला जोल्ले यांच्या संकल्पनेतून बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन निपाणी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या कृषी प्रदर्शनाचा समारोप प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डाॅ. अशोकराव माने (बापू) यांनी उत्सवास उपस्थिती दर्शवली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी.. कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्रिलदादा आवाडे, बेडक्या साखर कारखान्याचे चेअरमन स्वरूप महाडिक, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डाॅ. नीता माने हुपरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष जयश्री घाट, दिलीप खोत यासह आदी मान्यवर उपस्थित होते.