कोल्हापूर : महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी गावभाग, इचलकरंजी येथील महादेव मंदिरात आमदार राहुल आवाडे यांनी भक्तिमय वातावरणात महादेव अभिषेक व महाआरती मोठ्या उत्साहात पार पडली. अभिषेक व आरती संपन्न झाली. या वेळी अनेक भाविकांनी महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला व हर हर महादेवच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या शुभप्रसंगी उपस्थित भक्तगणांनी एकत्र येऊन महादेवाच्या चरणी प्रार्थना केली व सर्वांच्या कल्याणासाठी मंगलकामना केल्या.
