कुंभोज (विनोद शिंगे)
तिळवणी (ता.हातकणंगले) येथे संत गाडगेबाबा यांची १४९वी जयंती व दुसरी बौद्ध धम्म परिषद यांच्यावतीने प्रतिमा पूजन व पंचशील ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटन शुभारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्त संपन्न झाला.

यावेळी सरपंच राजेश पाटील, जिल्हा संघटन भारतीय बौद्ध महासभा दादासो गायकवाड, माजी डे. सरपंच सुकुमार चव्हाण, उपसरपंच दीपक गायकवाड,जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रमोद कदम अध्यक्ष रमाकांत काकडे उपाध्यक्ष राहुल गायकवाड, युवा नेते योगेश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
