कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्या मंदिर न्यू वाडदे या द्विशिक्षकी शाळेत बाल महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, हळदी कुंकू समारंभ, विविध स्पर्धा मध्ये संगीत खुर्ची, बादलीत बॉल टाकणे, रस्सीखेच, लिंबू चमचा यासारखे विविध खेळ घेण्यात आले.सौ. वर्षा शिंदे सौ.शितल पताडे,सौ.संगीता शिर्के सौ. सुवर्ण माळी सौ.पूजा राणे या महिलांनी पटकावलीत .
चिमुकल्यांचा खाद्य महोत्सव घेण्यात आला. वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते.स्नेहसंमेलनात पहिली ते चौथीपर्यंतच्या व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कार उत्कृष्टपणे सादर केला. ग्रामस्थांनी बक्षीसे दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. समाधान गायकवाड यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सरपंच श्री. दत्तात्रय पाटील व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सुनिता कातकर यांनी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक विठोबा ढोकरे , व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. सचिन ढोकरे व कन्या गडमुडशिंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल कंगणे , ग्रा.पं.सदस्य सौ. प्रिया मछले, सौ वैशाली कापसे सौ.कल्पना पाटील,सौ.दिपाली चव्हाण श्री.प्रल्हाद थोरवत , तसेच सौ.साधना पाटील श्री.अभिजित चव्हाण श्री. तानाजी पाटील , अंगणवाडी सेविका सौ. आनंदी बारबोटे व सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन कन्या वाठार शाळेचे पदवीधर अध्यापक श्री. महेश बन्ने व कु.दिपाली पाटील यांनी केले. आभार शाळेच्या अध्यापिका श्रीम. पुनम भोपळे यांनी मानले.
जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा गडहिंग्लजचे अधिकारी श्री किरण नागावे व सौ. पुनम नागावे या दांपत्याने समाजाचे देणं लागतोय म्हणून शाळेला २१हजार देऊन आदर्श निर्माण केला. शाळेच्या अध्यक्षा सौ. सुनिता कातकर ह्या नागावे च्या बहिण असुन शाळेला 21 हजाराची देणगी दिल्याबद्दल सरपंच मा.श्री.दत्तात्रय पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व अध्यक्ष व सर्व व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यामार्फत त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले