कुंभोज (विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्हा अखिल महाराष्ट्र गुरव समाज संघटना यांच्या वतीने शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी अभिषेक लान तोरस्कर चौक कोल्हापूर येथे राज्यव्यापी वधू वर मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमासाठी समारंभाचे अध्यक्ष म्हणून आर डी पाटील माजी सभापती स्थायी समिती कोल्हापूर विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर व माजी आमदार विजयराजे शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र गुरव समाज संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष धनाजी गुरव यांनी दिली. तसेच यावेळी हत्तीरोग तालुका डिजिटल मीडियाच्या संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल गुरव समाजाचे तालुका उपाध्यक्ष विनोद शिंगे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष डॉक्टर सुरेश गुरव खजानिस दत्तात्रय गुरव सरचिटणीस भैरू गुरव, कार्याध्यक्ष सहदेव गुरव, सेक्रेटरी कृष्णात गुरव व जनार्दन गुरव ,जगदीश गुरव तसेच गुरव समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज