कुंभोज ( विनोद शिंगे)
भारतीय जनता पार्टी व भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने संभाजीनगर येथील महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या महिलांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरुषांबरोबरच महिलांनीही आर्थिक हातभार लावला पाहिजे. यासाठी महिलांनी उद्योग व्यवसायामध्ये यावं, यासाठी भागीरथी महिला संस्था व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या पाठीशी असून त्यांना आर्थिक पाठबळ देईल व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असे मत सौ. अरुंधती महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या बचत गटातील महिलांना विविध मसाल्याचे पदार्थ प्रशिक्षण प्रशिक्षिका मा. अश्विनी वासकर यांनी दिले.
यावेळी रेणू येळगुळकर, मा. स्वाती पाटील, मा. माधुरी नकाते, मा. अलका जावीर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.